समस्या आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा समस्यांच्या मुळाशी जावून कायमची संपवा !! भगवंत चव्हाण

आपल्याला कुठेही पोहोचणे किती सोपे झाले आहे. आपण कोणत्याही शहराच्या कोणत्याही कोपऱ्यात कोणताही पत्ता सहज शोधू शकतो. तिथे पोहोचायला किती वेळ लागेल, हे चालण्याआधीही कळते. कोणत्या रस्त्यावर रहदारी होईल, कोणता रस्ता खुला असेल, हे लोकांना त्यांच्या फोनवर चुटकीसरशी जाणून घेता येऊ शकते. हे सर्व Google map मुळे शक्य झाले आहे. गाडी चालवणारे बहुतेक लोक सहजपणे योग्य पत्त्यावर जाण्यासाठी Google map वापरतात. Google map संकल्पना प्रथम गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांना सुचली. सुंदर पिचाई सध्या अल्फाबेट इंक (Alphabet Inc.) चे सीईओ आहेत. Google सारख्या अनेक कंपन्या अल्फाबेटच्या सहाय्यक (subsidiary) आहेत. म्हणजेच गुगल हे अल्फाबेटचे प्रॉडक्ट आहे. सुंदर पिचाई हे अमेरिकेत राहतात. ही गोष्ट आहे 2004 सालची. एका ओळखीच्या व्यक्तीने पिचाई यांना त्यांच्या घरी जेवायला बोलावलं होतं. सुंदर यांना बायकोसोबत जायचे असल्याने त्यांनी बायकोसोबत एक प्लॅन बनवला. सुंदर म्हणाले की, सकाळी ऑफिसला जायचे असल्याने ऑफिसनंतर ते थेट जेवण्यासाठी मित्राच्या घरी जेवायला पोहचतील. त्यांनी आपल्या पत्नीला थेट घरातून तिथे पोहोचण्यास सांगितले. रात्री 8 वाजता जेवणाचा कार्यक्रम होता. सुंदर पिचाई यांची पत्नी अंजली रात्री आठ वाजता त्यांच्या कारने जेवणासाठी पोहोचल्या. सुंदर पिचाई देखील ऑफिसमधून बाहेर पडले, पण त्यांचा रस्ता चुकला. ते कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले तेव्हा जवळजवळ 10 वाजले होते. पिचाई तिथे पोहोचले तेव्हा तिथून जेवण करून त्यांची पत्नी निघून गेली होती. त्यादिवशी सुंदर पिचाई तिथून काहीही न खाता त्यांच्या घरी परतले. ते घरी पोहचताच त्यांची पत्नी अंजली यांनी त्याच्याशी भांडण सुरू केले. ते वेळेवर पोहोचले नाहीत त्यामुळं कार्यक्रमात त्यांचा अपमान झाल्याचे त्यांना वाटले. अंजलीचा वाईट मूड पाहून सुंदर पिचाईंनी पुन्हा ऑफिसला परत जाण्याचे ठरवले आणि ते ऑफिसला गेले. संपूर्ण रात्र त्यांनी ऑफिसमध्ये घालवली. ते रात्रभर हाच विचार करत राहिले, जर मी अशाप्रकारे रस्ता चुकत असेन तर दररोज बरेच लोक अशाप्रकारे रस्ता चुकत असावेत. यावर असे काहीतरी हवे, ज्यामुळे कोणत्याही प्रकारे रस्ता चुकणार नाही. रात्रभर विचार करत असताना त्यांच्या लक्षात आलं की, जर नकाशा आपल्या खिशात असता तर बरोबर मार्ग सापडला असता आणि रस्ता चुकला नसता. दुसऱ्या दिवशी सकाळी सुंदर पिचाई यांनी आपल्या संपूर्ण टीमला बोलावून सर्वांसमोर नकाशा बनवण्याची कल्पना मांडली. ही कल्पना ऐकून त्यांची टीम तयार झाली. सर्वांनीच त्यांच्या कल्पनेवर विश्वास ठेवला नाही, परंतु जवळजवळ सलग दोन दिवस सर्वांसोबत बैठका घेतल्या आणि लोकांना रस्ता दाखवणाऱ्या उत्पादनाची रचना करण्याची गरज त्यांना पटवून दिली. सुंदर पिचाई आणि त्यांच्या टीमने खूप मेहनत घेतली आणि 2005 मध्ये गुगल मॅप बनवला आणि अमेरिकेत लाँच केला. पुढच्याच वर्षी 2006 मध्ये इंग्लंडमध्ये आणि 2008 मध्ये भारतातही लाँच करण्यात आला. आणि आता तुम्हा सर्वांना माहीतच आहे की, त्यांनी बनवलेले Google map संपूर्ण जगाला योग्य मार्ग दाखवण्याचे काम करत आहे. एका आकडेवारीनुसार, संपूर्ण जगातील प्रत्येक सातवी व्यक्ती Google map वापरते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुमच्या मुलाच्या अभ्यासची गती वाढण्यासाठी एक सोपी युक्ती

मानवी वर्तनाचा ठाव घेणारे मानसशास्त्र !! भगवंत चव्हाण

पालकांनो, मुलांना थोडा वेळ द्या, त्यांना समजून घ्या!