पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मुलांचे मित्र व्हा आणि त्यांना आपले विचार कळू द्या - भगवंत चव्हाण

 आपल्या मुलांच्या सहवासात तुम्ही वेळ घालवता तेव्हा त्यांच्याशी तुमचा एक विशेष बंध तयार होतो. शिवाय, यामुळे मुले आपले विचार व भावना चांगल्याप्रकारे व्यक्‍त करण्यास शिकतात. मुलांसोबत अशी जवळीक—घरातच नव्हे तर बाहेरही आणि कोणत्याही उचित वेळी असणे महत्त्वाचे आहे असे शास्त्रवचनांतही सांगण्यात आले आहे.—  महागड्या खेळण्यांपेक्षा किंवा विशिष्ट प्रकारच्या प्रशिक्षणापेक्षा आईवडील आपल्या मुलांसोबत जो वेळ घालवतात तो जास्त महत्त्वाचा असतो, या गोष्टीला बाल विकास तज्ज्ञ देखील दुजोरा देतात. ज्यांकरता वेगळा खर्च करावा लागणार नाही अशी दररोजची कामे करतानाही तुम्ही मुलांसोबत संवाद साधण्याच्या संधी निर्माण करू शकता. उदाहरणार्थ, मुलांना बागेत फिरायला नेऊन निसर्गातल्या विविध गोष्टींचे त्यांच्यासोबत तुम्ही निरीक्षण करू शकता. असे करताना त्यांना अर्थपूर्ण प्रश्‍न विचारून त्यांना आपले विचार व्यक्‍त करण्याचे प्रोत्साहन तुम्हाला देता येईल. शास्त्रवचनांत म्हटले आहे, की “नृत्य करण्याचा,” अर्थात आनंदाने बागडण्याचाही एक समय असतो. मोकळेपणाने खेळणे हे मुलांच्या बौद्धिक, भावनात्मक आणि सामाजिक विकासाकरता आवश्‍यक आहे. डॉ. म