पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सन फ्लॉवर थिअरी

  जसा जसा सूर्य पुढे पुढे सरकतो तसे हे सूर्य फुलं आपले तोंड त्या दिशेला करीत असतात. म्हणजेच सुर्य प्रकाश समोरून ग्रहण करीत असतात. हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. पण याबाबतीतील एक रहस्य कदाचित आपणास माहिती नसावे. ढगाळ आणि पावसाळी वातावरणात जेव्हा सूर्य संपूर्ण झाकला जातो त्यावेळी काय घडते? तुम्हाला वाटेल की ती फुलं मिटत असतील किंवा जमिनीकडे तोंड करीत असतील, नाही कां? नाही. तर काय घडते त्यावेळी? ही फुले खाली किंवा वरती नाही वळत तर ती वळतात समोरासमोर! एकमेकांना आपली साठवलेली ऊर्जा देण्यासाठी, इतरांनाही जगविण्यासाठी !! निसर्गाचं परिपूर्ण तेच वरदान खरंच आश्चर्यकारक आहे!! माणसाने ही निसर्गाची प्रतिक्रिया आपल्या जीवनात आणणे आवश्यक आहे. समाजात अनेक लोक काळजीने, चिंतेने, परिस्थितीने ग्रासलेले असतात. तेव्हा ही सूर्यफूल थिअरी उपयोगात आणली पाहिजे. जसे एकमेकांना मदत करणे आणि ऊर्जा प्रदान करणे, मनोबल वाढविणे ! तर सर्वांना सदिच्छा देऊ या की आपणही सूर्य फुलासारखे वागूया, संकटाच्या, निराशेच्या ढगाळ वातावरणात एकमेकांना साथ देऊ या, आपल्या चांगुलपणाची साक्ष देऊ या !!

मानवी वर्तनाचा ठाव घेणारे मानसशास्त्र !! भगवंत चव्हाण

इमेज
  आयुष्यात तुम्ही अमूकच वागता याला स्वभाव हेच कारण आहे की, आजुबाजूच्या वातावरणाचा कितपत प्रभाव आहे. काय टाळता येतील किंवा नेमकी अडचण काय आहे हे उलगडण्याचा प्रयत्न आम्ही करतो. अर्थात यात मानसशास्रीय पद्धतींचाही वापर केला जातो. -क्षुल्लक कारणांवरून होणारी भांडण, खून,बलात्कार सारख्या घटनांवर अंकुश आणण्याची गरज आहे. सातत्याने समोर येणाऱ्या विकृत प्रवृत्तींवर नुसते विचारमंथनच करण्यापेक्षा सखोल अभ्यास केल्यास पर्याय निघू शकतो. खरे तर या घटनांमुळे मानवी संबंधावरच प्रश्नचिन्ह उभे राहले आहे. शिवाय यातून कोणताच वयोगट सुटलेले नाही. खाजगी आयुष्य व समाजातील वावर यांतील अंतर फारसे उरले नाही. या अनुषंगाने मानसशास्राला खुप महत्त्व आलं आहे, असं डॉ. वैशाली अष्टपुत्रे यांनी सांगितलं. >  मानसशास्र कशाचा अभ्यास करते? मानवी वतर्नाचा अभ्यास करणारे शास्रशुद्ध शास्र म्हणजे मानसशास्र होय, असे थोडक्यात म्हणता येईल. सोप्या भाषेत सांगायचे असेल तर जिथे माणसांचा वावर असतो तिथे मानसशास्र असायलाच हवे. > प्र.नेमकी रूपरेषा कशी असते? आयुष्यात तुम्ही अमूकच वागता याला स्वभाव हेच कारण आहे की, आजुबाजूच्या वातावरणाचा कि

पालकांनो, तरुणांची सामाजिक नीतीमत्ता ढासळत आहे, हे लक्षात घ्या ! भगवंत चव्हाण

इमेज
१. तरुणांची अयोग्य विचारसरणी  अ. जगातील सर्व गोष्टी या आपल्याच उपभोगासाठी निर्माण झालेल्या आहेत आणि त्यांचा आस्वाद घेणे, हे आपले कर्तव्य आहे, असा भोगवादी विचार तरुण पिढीकडून सर्रास मांडला जात आहे.    आ. श्रीमंत तरुणांना वेगाने वाहन चालवणे आणि अपघात घडवणे, म्हणजे गडगंज संपत्तीचे प्रदर्शन  वाटते.     २.तरुणांमध्ये गुन्हेगारी कृत्ये करण्याची मानसिकता वाढण्याची कारणे  अ. तरुण पिढीला भावना, लालसा, हव्यास अशा गोष्टींचे सोयरसुतक नसते, हा तर त्यांचा स्थायीभाव झाला आहे. कशाही प्रकारे सुखाची लालसा पुरी करण्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली, तरी चालेल, अशी मानसिकता असणारी तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळतआहे.    आ. राजकीय गुन्हेगार काळी कृत्ये करून कायद्याला वाकुल्या दाखवतात, हे तरुण पिढी पहात आहे. त्यामुळे जिद्द, साहस आणि तत्त्वनिष्ठा यांकडे तरुण मुले दुर्लक्ष करत आहेत.  इ. आजची तरुण पिढी समाजात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अवैध मार्गाने संपत्ती मिळवण्याचा अट्टहास करीत आहे.   ई. खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार झाल्यानंतर तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळत आहे. जोपर्यंत त्यांना श

समस्या आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा समस्यांच्या मुळाशी जावून कायमची संपवा !! भगवंत चव्हाण

इमेज
आपल्याला कुठेही पोहोचणे किती सोपे झाले आहे. आपण कोणत्याही शहराच्या कोणत्याही कोपऱ्यात कोणताही पत्ता सहज शोधू शकतो. तिथे पोहोचायला किती वेळ लागेल, हे चालण्याआधीही कळते. कोणत्या रस्त्यावर रहदारी होईल, कोणता रस्ता खुला असेल, हे लोकांना त्यांच्या फोनवर चुटकीसरशी जाणून घेता येऊ शकते. हे सर्व Google map मुळे शक्य झाले आहे. गाडी चालवणारे बहुतेक लोक सहजपणे योग्य पत्त्यावर जाण्यासाठी Google map वापरतात. Google map संकल्पना प्रथम गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांना सुचली. सुंदर पिचाई सध्या अल्फाबेट इंक (Alphabet Inc.) चे सीईओ आहेत. Google सारख्या अनेक कंपन्या अल्फाबेटच्या सहाय्यक (subsidiary) आहेत. म्हणजेच गुगल हे अल्फाबेटचे प्रॉडक्ट आहे. सुंदर पिचाई हे अमेरिकेत राहतात. ही गोष्ट आहे 2004 सालची. एका ओळखीच्या व्यक्तीने पिचाई यांना त्यांच्या घरी जेवायला बोलावलं होतं. सुंदर यांना बायकोसोबत जायचे असल्याने त्यांनी बायकोसोबत एक प्लॅन बनवला. सुंदर म्हणाले की, सकाळी ऑफिसला जायचे असल्याने ऑफिसनंतर ते थेट जेवण्यासाठी मित्राच्या घरी जेवायला पोहचतील. त्यांनी आपल्या पत्नीला थेट

शिवरायांचा इतिहास

इमेज
नाशिक पासून 14 ते 15 किलोमीटर अंतरावर, नाशिक - पेठ (peint) महामार्गावर आशेवाडी गावाजवळ रामशेज नावाचा किल्ला आहे. हा किल्ला दिंडोरी तालुक्यात आहे. प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला जायचे, आणि तिथे त्यांची शेज आहे म्हणून या किल्ल्याला रामशेज असे नाव पडले. सिंहगड, प्रतापगड असे सह्याद्रीच्या रांगेतील बरेचसे किल्ले घनदाट जंगलात आहेत, डोंगर दऱ्यांमध्ये वसलेले आहेत. परंतु रामशेज हा किल्ला एका सपाट आणि मोकळ्या मैदानावर आहे. किल्लाच्या जवळपास झाडी, जंगल देखील नव्हते. डोंगर दऱ्यादेखील नव्हत्या. रामशेज किल्ल्याजवळचा एकमेव किल्ला म्हणजे त्र्यंबकगड परंतु तो देखील ८ कोस अंतरावर होता. हि सर्व परिस्थिती पाहता किल्ला अगदी एकाकी होता. शहाबुद्दीन खान ह्याच किल्ल्यावर चांदसितारा फडकवावा आणि त्या नंतर त्र्यंबक, अहिवंत, मार्कंडा, साल्हेर असे किल्ले जिंकून घ्यावेत असा औरंगजेबाचा मनसुबा होता. औरंगजेबाने आपला सरदार शहाबुद्दीन खान याला हा किल्ला जिंकण्यासाठी पाठवले. शहाबुद्दीन किल्ला घेण्यासाठी चालून आला. त्याच्या सोबत १० हजाराची फौज होती आणि अफाट दारुगोळा आणि तोफा होत्या. त्यामुळेच औरंगजेबाच्या सर

अभ्यास कसा करावा ?

  कोणतेही काम प्रभावी रितीने करण्यासाठी मनाच्या एकाग्रतेची गरज असते. एखादा लोहार, सुतार, केशकर्तनकार किंवा सोनार मनाची एकाग्रता सहजपणे अंगी बाणवितो. कारण एकाग्रतेच्या अभावी त्यांच्या कामामध्ये अपघात होउन नुकसान होण्याची शक्यता असते. मनाची एकाग्रता साधण्यासाठी हे कारागीर लोक कोणतीही पुस्तके वाचत नाहीत वा कोणत्या योगशिबीरातही जात नाहीत.   सरावाने   आपोआपच त्यांना ही एकाग्रता साधत असते. अभ्यास करणे हे विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे, आणि ते प्रभावी रितीने पार पाडण्यासाठी "मनाच्या एकाग्रतेची" गरज विद्यार्थ्याला निश्चितच आहे. मनाची एकाग्रता नसेल तर साध्या-साध्या कामांमध्येही चुका होउ शकतात, आणि एकाग्र मनाने अतिशय जोखमीची अवघड कामेदेखील अचूक होउन जातात. मनाच्या एकाग्रतेमध्ये येणारे अडथळे कोणते? मनाची चंचलता ही सर्वात मोठी अडचण आहे. मन मोठे बलवान असते, चंचल असते. मनाला काबूत ठेवणे वा-याला पकडण्याएवढे अवघड असते.   अखंड अभ्यास   आणि   अनासक्ती (वैराग्य)   यांच्या सामर्थ्यानेच मनाला ताब्यात ठेवता येते असे भगवंतांनी गीतेमध्ये सांगीतलेले आहे. मनाची एकाग्रता साधणे हे सहजसोपे नाही तसे अशक्यही न

शिक्षणाचे महत्त्व मराठी निबंध | Importance Of Education Essay In Marathi

मानवी विकास खऱ्या अर्थाने बुद्धीचा विकास म्हणता येईल. माणूस जेव्हा दोन पायावर चालायला शिकला तेव्हापासून बुद्धी विकसित होऊ लागल्याचा ऐतिहासिक संदर्भ आहे. माणूस हा अन्य प्राण्यांपेक्षा बौद्धिक पातळीवर वेगळा आहे. शारीरिक रचना आणि गरजा काही जास्त वेगळ्या नाहीत परंतु वाचन, विचार, आणि अस्तित्वाची जाणीव या गोष्टी माणूस अनुभवू शकतो. वाचन आणि विचार हेदेखील सुंदर आणि शुद्ध असणे गरजेचे आहे नाहीतर माणूस त्याच्या अशुद्ध विचारांनीच लयास जातो. सर्व चांगले आणि मंगल अनुभव आयुष्यात घडण्यासाठी माणसाने शिक्षण निर्माण केले. ते शिक्षण त्याच्या आंतरिक प्रेरणेतून निर्माण झाले. माणूस म्हणून कितीतरी विविध गोष्टी आणि वस्तू आपण सहजरीत्या हाताळू शकतो. आज विज्ञान आणि भौतिक विकास जो शक्य झाला त्यासाठी शिक्षणच जबाबदार आहे. शिक्षण विविध प्रकारे दिले जाते आणि ग्रहण सुद्धा केले जाते. एका महान व्यक्तीचा अनुभव हा पुढच्या पिढ्यांसाठी शिक्षण आणि मार्गदर्शन बनत असतो. त्या व्यक्तीचे विचार हे शब्दात मांडले जातात आणि आपण ते ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो. माणसाच्या पिढीजात गरजेनुसार शिक्षण बदलत गेले आहे तसेच त्याचा उपयोगही वेगवेगळ