google-site-verification: google6c9dc88706df2c17.html ZEP FOUNDATION

मंगळवार, ३ सप्टेंबर, २०१९

*पती-पत्नीसाठी* *HAPPY MARRIED LIFE*

www.zepfoundation.in


शिर्डी येथील साई हेरिटेज व्हीलेजच्या निसर्गरम्य वातावरणात 3 दिवशीय निवासी प्रशिक्षण

आजकालच्या धावपडीचा परिणाम प्रत्येकाच्या आयुष्यावर होतांना दिसून येत आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात असलेल्या सुंदर अश्या नात्यांमद्धे दुरावा निर्माण होतांना दिसत आहे. आम्ही फक्त नावालाच पती पत्नी असतो. खर जगन काय असत हे आम्ही विसरून जातो परंतु काही वैज्ञानिक पद्धतींचा वापर करून आपण आपल्या वैवाहिक जीवनात अजून गोडवा आणू शकतो. आणि तोच सुंदर अनुभव घेण्यासाठी आपल्यासाठी घेवून आलो आहोत एक प्रभावशाली ट्रेनिंग

                  HAPPY MARRIED LIFE 

कार्यक्रम कोणासाठी ?

1) लग्न ठरलय !! चला तर मग यावच लागेल....

2)नुकतच लग्न झालय !! चला सुरुवात सुंदर करूया.....

3)काय संसारात गुंतलाय !! आपल्यासोबत आपल्या मुलांना घडवण्यासाठी...

4)आता म्हातारे झालात !! शेवटचे क्षण सुंदर जगण्यासाठी.....

कार्यक्रमाला का यायचं ?

1) एकमेकांना वाटत असेन माझ्या जोडीदाराची ही सवय वाईट आहे ती कायमची त्यांच्या आयुष्यातून घालवण्यासाठी....

2) पतीला किंवा पत्नीला वाटत असेन माझी एकही इच्छा माझा जोडीदार पूर्ण करत नाही त्यांच्यासाठी .....

3) छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होतात......

4) वैवाहिक आयुष्य सुखकर आणि अधिक आनंदी करण्यासाठी.....

5) आपल्या आयुष्यातील प्रत्येक समस्येच वैज्ञानिक कारण जाणून घेण्यासाठी....

 वैशिष्ट्यपूर्ण व प्रभावशाली मांडणी करून  प्रशिक्षण देणारे भारतातील एकमेव ट्रेनर भगवंत चव्हाण आणि वैशाली पाटील यांच्यासोबत सापुतारा येथील निसर्गरम्य वातावरणात आपल्या आयुष्यातील 2 दिवस म्हणजेच तुमचे आयुष्य होणार सुखकर

फक्त 20 सीट उपलब्ध आपले सीट आरक्षित करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर नावनोंदणी करा
https://forms.gle/HHHC7zNxE1isWkWn9

सोमवार, २१ जानेवारी, २०१९

पालकांनो, मुलांना थोडा वेळ द्या, त्यांना समजून घ्या!

हल्ली मुलांचे संगोपन करणे म्हणजे कौशल्याचे काम आहे. कारण स्पर्धात्मक युगात माझी मुलगी किंवा माझा मुलगा मागे पडू नये यासाठी पालकांना सतत चिंता सतावत असते. पण लक्षात घ्या मुलं हे मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात त्याला जसं घडवू तसं ते घडतं. मुलांना आपण जे सांगू किवा आपण जसं बोलतो त्याचा परिणाम मुलांवर होतो. 

त्यामुळे पाल्याची बौद्धिक, मानसिक, शारीरिक, वाढ होत असताना वस्तुरूपी प्रेम नाही तर तुम्ही दिलेला वेळ बहुमूल्य असतो. त्यामुळे पालकांनी TV, Laptop, Computer, Tab, Mobile बाजूला ठेवून काही मुलांसोबत गप्पा मारायला हव्यात. हा उपक्रम खूप सकारात्मक बदल घडवून आणतो, आपल्यात आणि आपल्या पाल्यातही. आजची पिढी Gadget प्रिय. ती काळाची गरज सुद्धा आहे पण आपला पाल्य Gadget वर किती वेळ असतो. नेमक इंटरनेटवर काय Surfing करतोय? यावर लक्ष ठेवायला काहीच हरकत नाही. मात्र ते ही त्याला नकळत. 

सध्या स्वतःला त्रास देणं (self harm), चिडचिड करणं, सतत रागावणं, ह्या गोष्टी सध्या मुलांमध्ये जास्त दिसून येतात. अशात मुलांशी बोलण्यात काहीच उपयोग नसतो. यावेळी आपलाही पारा चढण्याची शक्यता असते. अशा वेळी पाल्याचे म्हणणे नीट ऐकून घ्यावे. नेमक्या कुठल्या मुद्यावर चिडचिड होतेय ते समजून घ्यावे. राग, चिडचिड कमी झाला कि शांतपणे आपला मुद्दा समजावून देता येतो. प्रसंगी ज्या मुद्द्यावरून चिडचिड झाली आहे त्याचीच गोष्ट तयार करावी, आपल्या पाल्याला केंद्रस्थानी ठेवावं आणि गोष्टी रूपातून आपला मुद्दा पटवून देता येईल. 

एखाद्या वस्तूचा अट्टाहास पाल्याने धरला असेल तर ती खरंच गरजेची आहे का? हे बघणं गरजेचं आहे किंवा त्या वस्तू ऐवजी दुसरी जी उपयोगाची वस्तू आहे ती देणं कधी हि सोयीस्कर. पण कधी-कधी नाही म्हणायला हरकत नाही. नाही म्हणण्यात ही गंमत आहे. नाही म्हणणं सुद्धा एक कला आहे. होतं काय, मुल वयात येत असताना त्यांना स्वतंत्र पणाची जाणीव होत असते. मग त्यांना त्यांच्या आवडी-निवडी प्रमाणे राहायला, वागायला आवडतं. यावेळी थोड त्यांच्या म्हणण्या नुसार चालवं. त्यांच्या आवडी-निवडी जाणून घ्याव्यात. पाल्याला त्याच्यासाठी काय योग्य आहे याची जाणीव करून द्यावी. मुलं चुकीच्या मार्गीला जाऊ नये यासाठी वेळोवेळी त्यांच्या Friend Circle चा आढावा घेणे खूप गरजेचे आहे. मुळात मुलांना थोडासा वेळ देणं आणि त्यांच्या गरजा समजून घेणं याशिवाय पालकत्व वेगळे नाही.

शुक्रवार, ११ जानेवारी, २०१९

तुमच्या मुलाच्या अभ्यासची गती वाढण्यासाठी एक सोपी युक्ती

जेव्हा मुले संध्याकाळी खेळून घरी येतात, क्लासला जाऊन येतात, किंवा दमून घरी येतात, तेव्हा कधीही मुलांना आल्या-आल्या “आता अभ्यासाला बसा” असं अजिबात सांगू नका. विशेषत: खेळून आल्यावर तर नाहीच नाही. कारण ‘अशावेळी’ हे वाक्य ऐकलं की मुलांना संताप येतो. अभ्यासाविषयी मनात अनास्था निर्माण होते. आणि मग अभ्यास न करण्याच्या नवनवीन सबबी मुले सुरू करतात. या सबबी ऐकल्या की तुमचं डोकं फिरू लागतं. अशावेळी तुमच्या मुलाला समजून घेण्याऐवजी, तुमच्या अंतर्मनात दडून असलेला राग एकदम उसळून वर येतो, तुम्ही बोलू लागता, “एव्हढावेळ खेळ झाला, टाइमपास झाला, तरी समाधान झालं नाही. अजूनही तुला अभ्यास करायचा नाही. तू काय ठरवलं आहेस तरी काय?”

लक्षात घ्या, या तुमच्या प्रश्नाला उत्तर न देता मुलं गप्प बसतात. तुमच्याकडे एकटक पाहात तरी राहतात, किंवा तुमची नजर चुकवून, नेमकी तुम्हाला नावडणारी एखादी कृती करतात. या गोष्टीचा तुम्हाला निश्चितच अतिशय राग येतो. आणि मग तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला तुम्हीच उत्तर देता, जी तुम्हाला सोयीची असतात.

 यामुळे, तुम्ही आणि तुमचा मुलगा यामधे विनाकारण नकळत क्रोधामुळे, एक दरी निर्माण होते. अभ्यास बाजूलाच राहतो. विषय भरकटतो. आणि सगळा राग त्या मुलावर म्हणजेच, पर्यायाने अभ्यासावर निघतो. अशा संतप्त वातावरणात, आणि ज्वालामुखीच्या सहवासात, मुले कदापी अभ्यास करू शकत नाहीत.

हे सारं घडल, कारण तुम्ही तुमच्या मुलाचं मन समजून न घेता, त्याला विश्वासात न घेता, त्याची प्रेमाने विचारपूसही न करता, थेट तुम्ही त्याला झापायलाच सुरुवात केली आहे. 

आपण बदलूया. आपण आपलं मूल अधिकाधिक समजून घ्यायचा प्रयत्न करुया. त्याच्यावर विश्वास टाकूया, आणि पाहा चमत्कार होतो की नाही...!!!

मुलगा संध्याकाळी दमून घरी आला, क्लासमधून घरी आला, किंवा खेळून घरी आला की, लगेचच अभ्यासाचा विषय काढूच नका. आज दिवसभरात काय मजा आली? ते विचारा. त्याच्या खास मित्र मैत्रिणींची चौकशी करा. 

‘तू दमला असशील, आता पाच मिनिटं अगदी शांत निवांत बस बघू...’ असं ही म्हणा आणि मग, “आता आपण तुझ्या अभ्यासाचे पाहूया” असं स्मितहास्य करीत त्याला अगदी सहज म्हणा... थोडं स्थिरस्थावर व्हायला त्यालाही थोडा अवकाश द्या. विश्वास ठेवा, यानंतर मुले मनापासून अभ्यास करतात.

सक्ती केल्याने, लादल्याने, अभ्यासाबाबत टोचून बोलल्याने, किंवा सारखे कर-कर म्हंटल्याने, मुले अजिबात अभ्यास करत नाहीत... ती फक्त ‘अभ्यास करत असल्याचा देखावा’ करतात. पुस्तक डोळ्यासमोर आणि मनात विचार दुसरेच. कारण तुमच्या अशा वागण्याने त्यांना असुरक्षित वाटत असतं.

पालक जेव्हा आपलं मन मोठं करतात, आणि आपल्या प्रेमाची जाणीव आपल्या कृतीतून करुन देतात, तेव्हा त्यांची मुलं आश्वस्त होतात. जेव्हा दडपण नसत, तेव्हा मुलांना अभ्यासाचा देखावा करावा लागत नाही. मुले मोकळ्या मनाने अभ्यास करतात. आणि हेच तर आपल्याला हवं आहे. 

‘जेव्हा पालक स्वत:त दहा टक्के बदल करतात, तेव्हा मुलात शंभर टक्के बदल होतो’, हे लक्षात घ्या

सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१८

💁‍♂ _*पालकांनो, काळ बदललाय, तुम्हीही बदला!*_

पालकांनो, काळ बदललाय, तुम्हीही बदला!

"आजकालची पिढी ओव्हर स्मार्ट झालीय. आगाऊपणा आणि उद्धटपणा तर विचारू नका. कुणाचा धाक नाही अजिबात.'' अशा प्रकारची कूज-बूज ठिकठिकाणी ऐकायला मिळते. पण काळ बदललाय, त्यानुसार पालकत्वाची संकल्पनाही बदललीय. या बदलांना अनुसरून आता पालकांनी मुलांसोबत संवाद साधायला हवा…

खरा विचार केला, तर मुले बिघडली आहेत का? हा पहिला प्रश्न. काळ बदलला आहे, पिढी बदलली आहे हे आजकाल स्वीकारलेच जात नाही. अजूनही पालक "आम्ही 30-40 वर्षापूर्वी कसे होतो?' यातच रमत आहे. "आम्ही कसे आई-वडिलांच्या धाकात होतो, एवढे आगाऊ नव्हतो' याच विचारात वावरणारे आजकालचे पालक मुलांच्याकडून अवास्तव अपेक्षा करत आहेत.

कारण एक लक्षात घ्या आजच्या पिढीला सर्व सोयी-सुविधा मिळतात, बंधने कमी झाली आहेत. याबद्दल "आम्हाला हे सर्व काहीही मिळत नव्हते आणि या मुलांना मिळते आहे त्याचा ते गैरवापर करत आहेत' असा आरोप करून मोकळं होणं चुकीचे आहे. कारण यामध्ये या मुलांचा काय दोष आहे? किंवा त्यांच्यात जे बदल होतात आणि त्यातून त्यांची वागणूक होते ती जाणून बुजूनच केली जाते असा आरोप करणे चुकीचे आहे. कारण या बदलांशी जुळवून घेणे आणि त्याप्रमाणे स्वतःची प्रतिमा सांभाळणे ही या मुलांच्या दृष्टिकोनातून तारेवरची कसरत असते.

म्हणून मुलांची नैसर्गिक वाढ मान्य करून आपल्या पाल्याला नैसर्गिकरीत्या वाढू देण्यास वाट मोकळी करा. कारण बदल हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे पालकांनी पिढीनुसार झालेले बदल स्वीकारून ते अंगीकारणे गरजेचे आहे.

रविवार, २५ नोव्हेंबर, २०१८

गोष्ट यशाची

ज्या कोर्ट समोर मागायची भिक तिथेच झाली जज, भारतातील पहिली तृतीयपंथी न्यायधीश

एका पारंपरिक हिंदू कुटुंबात जोईता मोडंल यांचा जन्म झाला. जोईता या तृतीयपंथी असल्याने त्यांना लहानपणापासून खूप भेदभाव आणि त्रास सहन करावा लागला. त्यांना याच कारणामुळे पुढे शाळा सोडावी लागली. एवढेच नव्हे तर त्यांना भीक मागावे लागले आणि बस स्टँडवरही झोपावे लागले. आता त्या स्वतःला खूप समाधानी मानतात, कारणही तसेच आहे. त्या बनल्या आहेत भारताच्या पहिल्या तृतीयपंथी न्यायाधीश.29 वर्षीय जोयंतो (पुरुष) यांचा जन्म कोलकाता शहरात झाला. शाळेत त्यांचे जेंडर बद्दल असलेल्या शाळेच्या पूर्तता त्या करण्यास अपयशी ठरल्याने त्यांना इयत्ता 10 वि मध्ये शाळेतून काढून टाकण्यात आले. एका चॅनेल दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या जुन्या आठवणींना उजाळा दिला. जॉईता यांचा भिकारी तृतीयपंथी ते न्यायाधीश पदापर्यंतचा प्रवास अत्यंत संघर्षमय होता. एक तृतीयपंथी न्यायाधीश बनण्याचा क्षण तृतीयपंथीच नव्हे तर संपूर्ण भारतीयांसाठी सुद्धा कौतुकाचा आहे. जॉईतांचा हा प्रवास मुकीच सोपा नव्हता. केवळ विचारांच्या परिवर्तनामुळे आणि मनात असलेल्या जिद्दीमुळेच जीवन जगण्यासाठी भीक मागणे, भीक मागता मागता सामाजिक काम करणे आणि त्याचसोबत आपले शिक्षण सुरू ठेवणे, हे सगळे जॉईताने केले आहे.जॉईता या कोलकाता मध्ये होणाऱ्या भेदभावला कंटाळून उत्तर दिनाजपुर जिल्ह्यातील इस्लामपूर येथे आल्या आणि परत गेल्याच नाही.सुरुवातीच्या काळात त्यांनी हिजडा म्हणून काम करण्याबरोबर इतर तृतीयपंथी लोकांच्या हक्कासाठी ही लढा दिला. त्यानंतर त्यांनी समाजातील प्रत्येक भेदभाव होणाऱ्या व्यक्तीसाठी लढा उभारला. त्यांनी या सर्व कामांसोबत आपले मुक्त विद्यापीठातून कायद्याचे शिक्षणही पूर्ण केले.2010 साली त्यांना आपले मतदान कार्ड मिळाले. आपल्या जिल्ह्यात मतदान कार्ड मिळवणाऱ्या त्या पहिल्या तृतीयपंथी होत्या.काही वर्षांपूर्वी जॉईता यांनी समाजातील वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलेल्या लोकांसाठी स्वतःची एक संस्थाही चालू केली. जिल्यातील हजारो व्यक्तींना त्यांची संस्था मदत पोहोचवते. आतापर्यंत मिळालेल्या यशा व्यतिरिक्त त्यांनी त्यांच्या तृतीयपंथीपणामुळे हॉटेल मध्ये रूम न मिळाल्यामुळे बस स्टँड वर झोपावं लागल्याच्या वाईट स्मृतींना TOI ला दिलेल्या मुलाखतीत उजाळा दिला.कोलकाता येथील घर सोडल्यानंतर 10 वर्षांनी आता जुलै मध्ये जॉईता यांची दिवाणी न्यायालयात न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे. विशेष बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी त्या झोपत असलेल्या बस स्टँड पासून त्यांची निवड झालेले न्यायालय 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. असे त्यांनी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलखातीत म्हटले आहे. 8 जुलै या दिवशी जॉईता यांना इस्लामपूर सब-डिव्हिजनल लीगल सर्व्हिस कमिटीने न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. आपल्या वाट्याला आलेले जीवन इतर तृतीयपंथी लोकांच्या वाट्याला येऊ न देण्यासाठी जॉईता नेहमी प्रयत्नशील असतात.जॉईतांनी इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, ‘माझ्या यशाबद्दल मला अभिमान आहे. न्यायाधीश म्हणून माझी झालेली निवड ही लिंगभेद करणाऱ्या समाजाला मिळालेली चपराक आणि संदेशही आहे. तृतीयपंथी समाजातील 2-3 टक्के लोकांनाही नोकऱ्या मिळावून देता आल्या तर मला माझ्या पदाबद्दल समाधान वाटेल. कारण इतर जे तृतीयपंथी 100-200 रुपयांसाठी सेक्स वर्कर्सचं काम करतात, त्यांनाही या त्रासापासून मुक्तता मिळेल व ते सुखाची झोप घेऊ शकतील.’ त्या पुढे बोलताना म्हणाल्या की ‘मी जरी आता वातावणूकुलीत गाड्यामध्ये फिरत असले तरी माझ्या समाजातील इतर तृतीयपंथीना दिवसा भीक आणि सेक्स वर्कर्स म्हणूनच काम करावे लागत आहे.’

एक हजार दिवसांची 'तपश्चर्या' अन् तुमचं बाळ होईल हुश्शार

एक हजार दिवसांची 'तपश्चर्या' अन् तुमचं बाळ होईल हुश्शार

गर्भधारणा आणि बाळाच्या जन्मानंतरचे सुरुवातीचे 1000 दिवस त्याच्या संपूर्ण आयुष्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे असतात.
गर्भधारणा आणि बाळाच्या जन्मानंतरचे सुरुवातीचे 1000 दिवस त्याच्या संपूर्ण आयुष्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे असतात. आपले बाळ हुशार असावं, त्याच्यात आत्मविश्वास असावा, सर्व गोष्टी अगदी सहजरित्या आत्मसात कराव्यात, त्यानं सकारात्मक दृष्टीनं आयुष्याकडे पाहावे, यासाठी प्रत्येक आईवडील धडपड करत असतात. त्याचे संगोपन योग्यरित्या व्हावं, यासाठी पालक अहोरात्र प्रयत्न करत असतात. सुरुवातीच्या दिवसांमध्ये बाळाचे योग्य त्या दिशेनं पोषण न झाल्यास त्याच्या मेंदूचा विकासात मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. असे झाल्यास याची भरपाई आयुष्यभर होऊ शकत नाही.  गर्भधारणा आणि बाळाच्या जन्मानंतरच्या 1000 दिवसांतील संगोपन त्याच्या मेंदू आणि शरीराची निरोगी वाढ होण्यास आणि प्रतिकारकशक्ती वाढवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. शारीरिक व मानसिक विकासादरम्यान संसर्ग, आजारपण यांसारख्या गंभीर समस्या उद्भवल्यास बाळाच्या शरीर व मेूंदची वाढ योग्यरित्या होत नाही. यामुळे नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता नसणे, शैक्षणिक उपक्रमांमध्ये मागे पडणे, उत्साह नसणे अशा तक्रारी निर्माण होऊ शकतात.तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचं आरोग्य हे त्याच्या जन्मानंतरच्या 1000 दिवसांमध्ये करण्यात आलेल्या संगोपनावर अवलंबून असते. या कालावधीत मिळाणारे पोषण हे लठ्ठपणा, कुपोषित, आजार आणि अन्य बाबींशीदेखील संबंधित असते. नवजात बाळाच्या शरीरातील रोगप्रतिकारात्मक शक्ती वाढवण्यासाठी त्याच्या जन्मानंतर एक तासाच्या आत आईचे दूध पाजणं आवश्यक असते. दोन वर्षापर्यंत बाळाला स्तनपान करावे. आईचे दूध प्यायल्याने बाळाचे संसर्ग आणि आजारांपासून संरक्षण होते. स्तनपानामुळे बाळाला आवश्यक ती पोषकतत्त्वदेखील मिळतात. शिवाय, पचनक्रियादेखील सुधारण्यास मदत होते. आईचे दूध प्यायल्यानं मुलाचा मानसिक व शारीरिक विकास होतो व आजारांची लागण होण्याचाही धोका कमी होतो.
6 महिन्यांपासून ते 18 वर्षांपर्यंत पोषणासंबंधीच्या गरज पूर्णतः बदलतात. आईच्या दूधाव्यतिरिक्त त्याला पौष्टिक आणि सकस आहार मिळणंही आवश्यक आहे. मुलांच्या शारीरिक व मानसिक आवश्यकतेनुसार त्यांना व्हिटॅमिन्स, मिनरल्ससहीत प्रोटिन्स, लोह, कार्बोहायड्रेट्सचा आहारातून पुरवठा करावा.  बाळ एक वर्षांचं झालं त्याला की त्याला/तिला कुटुंबीयांसहीत जेवण करण्याची सवय लावावी. यावेळी त्याच्या आहारात सुका मेवा, कच्च्या भाज्या, दही इत्यादी प्रमाणे पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. मात्र त्याचा आहार स्वतःहून न ठरवता डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा. आहारात सुका मेव्याचे प्रमाण तसे कमीच ठेवावे कारण यामध्ये प्रचंड प्रमाणात कॅलरीज् असतात. मटार, डाळी, अंडी हे प्रोटिन्सचे उत्तम स्त्रोत आहेत. याव्यतिरिक्त फळे खाण्याचीही सवय बाळाला लावावी. जसे-जसे वय वाढत जाईल, तसे-तसे बाळाला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खाऊ घालाव्यात. 

शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१८

Memory Techniques Workshop

Memory Techniques Workshop


In memory techniques workshop, you will learn       
Photographic memory method to remember answers.
Technique of remembering points of an answer. 
Techniques of remembering study related data. 
Technique of remembering 15 Words, Names, Points and recalling them in any sequence.
Technique of remembering calendar of 400 years.
Technique of remembering List, Appointments, day to day work.
Brain Gym.Super Fast Maths Workshop

After learning Super Fast Maths Techniques, we can solve problems based on addition, subtraction, multiplication, division, square, square root, cube, cube root quickly. 

    On mastering Super Fast Maths Techniques, one can solve following problems in 10 to 15 seconds each.
569 x 893 = ?
6738.78 / 837 = ?
Squaqre(639) =?
Squaqre root(828169) =?
Cube(89) =?
Cube root(704.969) =?


Mind Power Workshop
Subconscious mind represents 90% of our total mind function. 
Subconscious mind is a vast storehouse of intelligence and power.
In Mind Power workshop, you will learn How to use powers of Subconscious mind
How to use subconscious mind and  it’s tremendous power to bring success and happiness into our lives.
Master Mind Control Technique 
Mind Programming Technique                                     
Personality DevelopmentHow to strengthen willpower
How to improve concentration
Self Esteem & Self Confidence Building
Leadership Skill, Motivation, Positive Thinking 
Communication Skill, Listening Skill
Body Language, Telephone Etiquette
Time Management, Stress Management                   
How to achieve GoalGoal Setting & Techniques to achieve Goal
 ‘Energy Card’ Technique
‘Screen Play’ Technique
Powers required to achieve success 
Golden Rules of MoneyPro. BHAGWANT CHAVHAN
Memory Expert,
 Superfast Math's Expert,

Mind Power Expert