मुलांचे मित्र व्हा आणि त्यांना आपले विचार कळू द्या - भगवंत चव्हाण

 आपल्या मुलांच्या सहवासात तुम्ही वेळ घालवता तेव्हा त्यांच्याशी तुमचा एक विशेष बंध तयार होतो. शिवाय, यामुळे मुले आपले विचार व भावना चांगल्याप्रकारे व्यक्‍त करण्यास शिकतात. मुलांसोबत अशी जवळीक—घरातच नव्हे तर बाहेरही आणि कोणत्याही उचित वेळी असणे महत्त्वाचे आहे असे शास्त्रवचनांतही सांगण्यात आले आहे.— 

महागड्या खेळण्यांपेक्षा किंवा विशिष्ट प्रकारच्या प्रशिक्षणापेक्षा आईवडील आपल्या मुलांसोबत जो वेळ घालवतात तो जास्त महत्त्वाचा असतो, या गोष्टीला बाल विकास तज्ज्ञ देखील दुजोरा देतात. ज्यांकरता वेगळा खर्च करावा लागणार नाही अशी दररोजची कामे करतानाही तुम्ही मुलांसोबत संवाद साधण्याच्या संधी निर्माण करू शकता. उदाहरणार्थ, मुलांना बागेत फिरायला नेऊन निसर्गातल्या विविध गोष्टींचे त्यांच्यासोबत तुम्ही निरीक्षण करू शकता. असे करताना त्यांना अर्थपूर्ण प्रश्‍न विचारून त्यांना आपले विचार व्यक्‍त करण्याचे प्रोत्साहन तुम्हाला देता येईल.

शास्त्रवचनांत म्हटले आहे, की “नृत्य करण्याचा,” अर्थात आनंदाने बागडण्याचाही एक समय असतो. मोकळेपणाने खेळणे हे मुलांच्या बौद्धिक, भावनात्मक आणि सामाजिक विकासाकरता आवश्‍यक आहे. डॉ. मस्टर्ड यांच्या मते तर, खेळणे हे मुलांसाठी फक्‍त आवश्‍यकच नव्हे, तर अत्यावश्‍यक आहे. ते म्हणतात: “खेळताना मुलांच्या मेंदूतील तंत्रिका मार्गांचा विकास होतो जेणेकरून त्यांना अनेकविध कार्यक्षमता प्राप्त होतात.” अशा प्रकारच्या स्वयंस्फूर्त खेळांत अगदी साधी खेळणी वापरली जाऊ शकतात, जसे पुठ्ठ्याचा रिकामा डबा. महागड्या इलेक्ट्रॉनिक खेळण्यांइतकेच मुलांना साध्या घरगुती वस्तूंबद्दलही कुतूहल वाटते.

तज्ज्ञांच्या मते, सतत कोणातरी प्रौढ व्यक्‍तीच्या निगराणी व मार्गदर्शनाखाली, पूर्वनियोजित खेळ खेळल्यामुळे मुलांच्या कल्पकतेला व सर्जनशीलतेला वाव मिळत नाही. पालकांनी वाजवी असायला हवे. मुलांना आपल्याभोवतीच्या विश्‍वाचे स्वतःहून निरीक्षण करू द्या; लहानसहान अडथळ्यांना तोंड देऊन आपल्या बुद्धीच्या परीने त्यांवर मात करू द्या. सहसा मुले आपले मनोरंजन करण्याकरता स्वतःहूनच काहीतरी शोधून काढतात. अर्थात, आपले मूल काय करत आहे, ते कोठे खेळत आहे आणि त्याला काही इजा तर होणार नाही याची खात्री करण्याची आईवडिलांची जबाबदारी आहेच.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुमच्या मुलाच्या अभ्यासची गती वाढण्यासाठी एक सोपी युक्ती

मानवी वर्तनाचा ठाव घेणारे मानसशास्त्र !! भगवंत चव्हाण

पालकांनो, मुलांना थोडा वेळ द्या, त्यांना समजून घ्या!