ЁЯТБ‍♂ _*рдкाрд▓рдХांрдиो, рдХाрд│ рдмрджрд▓рд▓ाрдп, рддुрдо्рд╣ीрд╣ी рдмрджрд▓ा!*_

पालकांनो, काळ बदललाय, तुम्हीही बदला!

"आजकालची पिढी ओव्हर स्मार्ट झालीय. आगाऊपणा आणि उद्धटपणा तर विचारू नका. कुणाचा धाक नाही अजिबात.'' अशा प्रकारची कूज-बूज ठिकठिकाणी ऐकायला मिळते. पण काळ बदललाय, त्यानुसार पालकत्वाची संकल्पनाही बदललीय. या बदलांना अनुसरून आता पालकांनी मुलांसोबत संवाद साधायला हवा…

खरा विचार केला, तर मुले बिघडली आहेत का? हा पहिला प्रश्न. काळ बदलला आहे, पिढी बदलली आहे हे आजकाल स्वीकारलेच जात नाही. अजूनही पालक "आम्ही 30-40 वर्षापूर्वी कसे होतो?' यातच रमत आहे. "आम्ही कसे आई-वडिलांच्या धाकात होतो, एवढे आगाऊ नव्हतो' याच विचारात वावरणारे आजकालचे पालक मुलांच्याकडून अवास्तव अपेक्षा करत आहेत.

कारण एक लक्षात घ्या आजच्या पिढीला सर्व सोयी-सुविधा मिळतात, बंधने कमी झाली आहेत. याबद्दल "आम्हाला हे सर्व काहीही मिळत नव्हते आणि या मुलांना मिळते आहे त्याचा ते गैरवापर करत आहेत' असा आरोप करून मोकळं होणं चुकीचे आहे. कारण यामध्ये या मुलांचा काय दोष आहे? किंवा त्यांच्यात जे बदल होतात आणि त्यातून त्यांची वागणूक होते ती जाणून बुजूनच केली जाते असा आरोप करणे चुकीचे आहे. कारण या बदलांशी जुळवून घेणे आणि त्याप्रमाणे स्वतःची प्रतिमा सांभाळणे ही या मुलांच्या दृष्टिकोनातून तारेवरची कसरत असते.

म्हणून मुलांची नैसर्गिक वाढ मान्य करून आपल्या पाल्याला नैसर्गिकरीत्या वाढू देण्यास वाट मोकळी करा. कारण बदल हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे पालकांनी पिढीनुसार झालेले बदल स्वीकारून ते अंगीकारणे गरजेचे आहे.

рдЯिрдк्рдкрдг्рдпा

рдпा рдм्рд▓ॉрдЧрд╡рд░ीрд▓ рд▓ोрдХрдк्рд░िрдп рдкोрд╕्рдЯ

рддुрдордЪ्рдпा рдоुрд▓ाрдЪ्рдпा рдЕрдн्рдпाрд╕рдЪी рдЧрддी рд╡ाрдврдг्рдпाрд╕ाрдаी рдПрдХ рд╕ोрдкी рдпुрдХ्рддी

рдоाрдирд╡ी рд╡рд░्рддрдиाрдЪा рдаाрд╡ рдШेрдгाрд░े рдоाрдирд╕рд╢ाрд╕्рдд्рд░ !! рднрдЧрд╡ंрдд рдЪрд╡्рд╣ाрдг

рдкाрд▓рдХांрдиो, рдоुрд▓ांрдиा рдеोрдбा рд╡ेрд│ рдж्рдпा, рдд्рдпांрдиा рд╕рдордЬूрди рдШ्рдпा!