मुलांचे मित्र व्हा आणि त्यांना आपले विचार कळू द्या - भगवंत चव्हाण

 आपल्या मुलांच्या सहवासात तुम्ही वेळ घालवता तेव्हा त्यांच्याशी तुमचा एक विशेष बंध तयार होतो. शिवाय, यामुळे मुले आपले विचार व भावना चांगल्याप्रकारे व्यक्‍त करण्यास शिकतात. मुलांसोबत अशी जवळीक—घरातच नव्हे तर बाहेरही आणि कोणत्याही उचित वेळी असणे महत्त्वाचे आहे असे शास्त्रवचनांतही सांगण्यात आले आहे.—  महागड्या खेळण्यांपेक्षा किंवा विशिष्ट प्रकारच्या प्रशिक्षणापेक्षा आईवडील आपल्या मुलांसोबत जो वेळ घालवतात तो जास्त महत्त्वाचा असतो, या गोष्टीला बाल विकास तज्ज्ञ देखील दुजोरा देतात. ज्यांकरता वेगळा खर्च करावा लागणार नाही अशी दररोजची कामे करतानाही तुम्ही मुलांसोबत संवाद साधण्याच्या संधी निर्माण करू शकता. उदाहरणार्थ, मुलांना बागेत फिरायला नेऊन निसर्गातल्या विविध गोष्टींचे त्यांच्यासोबत तुम्ही निरीक्षण करू शकता. असे करताना त्यांना अर्थपूर्ण प्रश्‍न विचारून त्यांना आपले विचार व्यक्‍त करण्याचे प्रोत्साहन तुम्हाला देता येईल. शास्त्रवचनांत म्हटले आहे, की “नृत्य करण्याचा,” अर्थात आनंदाने बागडण्याचाही एक समय असतो. मोकळेपणाने खेळणे हे मुलांच्या बौद्धिक, भावनात्मक आणि सामाजिक विकासाकरता आवश्‍यक आ...

सन फ्लॉवर थिअरी

 जसा जसा सूर्य पुढे पुढे सरकतो तसे हे सूर्य फुलं आपले तोंड त्या दिशेला करीत असतात. म्हणजेच सुर्य प्रकाश समोरून ग्रहण करीत असतात. हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. पण याबाबतीतील एक रहस्य कदाचित आपणास माहिती नसावे. ढगाळ आणि पावसाळी वातावरणात जेव्हा सूर्य संपूर्ण झाकला जातो त्यावेळी काय घडते? तुम्हाला वाटेल की ती फुलं मिटत असतील किंवा जमिनीकडे तोंड करीत असतील, नाही कां? नाही. तर काय घडते त्यावेळी? ही फुले खाली किंवा वरती नाही वळत तर ती वळतात समोरासमोर! एकमेकांना आपली साठवलेली ऊर्जा देण्यासाठी, इतरांनाही जगविण्यासाठी !! निसर्गाचं परिपूर्ण तेच वरदान खरंच आश्चर्यकारक आहे!! माणसाने ही निसर्गाची प्रतिक्रिया आपल्या जीवनात आणणे आवश्यक आहे. समाजात अनेक लोक काळजीने, चिंतेने, परिस्थितीने ग्रासलेले असतात. तेव्हा ही सूर्यफूल थिअरी उपयोगात आणली पाहिजे. जसे एकमेकांना मदत करणे आणि ऊर्जा प्रदान करणे, मनोबल वाढविणे ! तर सर्वांना सदिच्छा देऊ या की आपणही सूर्य फुलासारखे वागूया, संकटाच्या, निराशेच्या ढगाळ वातावरणात एकमेकांना साथ देऊ या, आपल्या चांगुलपणाची साक्ष देऊ या !!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट यशाची

💁‍♂ _*पालकांनो, काळ बदललाय, तुम्हीही बदला!*_

मुलांचे मित्र व्हा आणि त्यांना आपले विचार कळू द्या - भगवंत चव्हाण