मुलांचे मित्र व्हा आणि त्यांना आपले विचार कळू द्या - भगवंत चव्हाण

 आपल्या मुलांच्या सहवासात तुम्ही वेळ घालवता तेव्हा त्यांच्याशी तुमचा एक विशेष बंध तयार होतो. शिवाय, यामुळे मुले आपले विचार व भावना चांगल्याप्रकारे व्यक्‍त करण्यास शिकतात. मुलांसोबत अशी जवळीक—घरातच नव्हे तर बाहेरही आणि कोणत्याही उचित वेळी असणे महत्त्वाचे आहे असे शास्त्रवचनांतही सांगण्यात आले आहे.—  महागड्या खेळण्यांपेक्षा किंवा विशिष्ट प्रकारच्या प्रशिक्षणापेक्षा आईवडील आपल्या मुलांसोबत जो वेळ घालवतात तो जास्त महत्त्वाचा असतो, या गोष्टीला बाल विकास तज्ज्ञ देखील दुजोरा देतात. ज्यांकरता वेगळा खर्च करावा लागणार नाही अशी दररोजची कामे करतानाही तुम्ही मुलांसोबत संवाद साधण्याच्या संधी निर्माण करू शकता. उदाहरणार्थ, मुलांना बागेत फिरायला नेऊन निसर्गातल्या विविध गोष्टींचे त्यांच्यासोबत तुम्ही निरीक्षण करू शकता. असे करताना त्यांना अर्थपूर्ण प्रश्‍न विचारून त्यांना आपले विचार व्यक्‍त करण्याचे प्रोत्साहन तुम्हाला देता येईल. शास्त्रवचनांत म्हटले आहे, की “नृत्य करण्याचा,” अर्थात आनंदाने बागडण्याचाही एक समय असतो. मोकळेपणाने खेळणे हे मुलांच्या बौद्धिक, भावनात्मक आणि सामाजिक विकासाकरता आवश्‍यक आ...

पालकांनो, तरुणांची सामाजिक नीतीमत्ता ढासळत आहे, हे लक्षात घ्या ! भगवंत चव्हाण


१. तरुणांची अयोग्य विचारसरणी 
अ. जगातील सर्व गोष्टी या आपल्याच उपभोगासाठी निर्माण झालेल्या आहेत आणि त्यांचा आस्वाद घेणे, हे आपले कर्तव्य आहे, असा भोगवादी विचार तरुण पिढीकडून सर्रास मांडला जात आहे. 
  आ. श्रीमंत तरुणांना वेगाने वाहन चालवणे आणि अपघात घडवणे, म्हणजे गडगंज संपत्तीचे प्रदर्शन  वाटते.  

 २.तरुणांमध्ये गुन्हेगारी कृत्ये करण्याची मानसिकता वाढण्याची कारणे 
अ. तरुण पिढीला भावना, लालसा, हव्यास अशा गोष्टींचे सोयरसुतक नसते, हा तर त्यांचा स्थायीभाव झाला आहे. कशाही प्रकारे सुखाची लालसा पुरी करण्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली, तरी चालेल, अशी मानसिकता असणारी तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळतआहे. 
  आ. राजकीय गुन्हेगार काळी कृत्ये करून कायद्याला वाकुल्या दाखवतात, हे तरुण पिढी पहात आहे. त्यामुळे जिद्द, साहस आणि तत्त्वनिष्ठा यांकडे तरुण मुले दुर्लक्ष करत आहेत. 
इ. आजची तरुण पिढी समाजात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अवैध मार्गाने संपत्ती मिळवण्याचा अट्टहास करीत आहे. 
 ई. खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार झाल्यानंतर तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळत आहे. जोपर्यंत त्यांना शिक्षेचे गांभीर्य कळत नाही, तोपर्यंत त्यांना पश्चात्ताप होणार नाही. 
  
  ३. तरुणांकडून होत असलेले पाश्चिामात्यांचे अंधानुकरण ! 
अ. दूरचित्रवाहिन्यांवरील असंस्कृत मालिकांच्या चित्रणामुळे सुसंस्कृत तरुण हबकून गेल्याचे, तर असंस्कृत तरुण पिढी बहकल्याचे पहावयास मिळत आहे. 
 आ. तरुण मुले पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करत असून संस्कारांची होळी करत आहेत. 
 इ. आज शहरात पब (मद्यालये), डान्स बार, हुक्कापार्लर निर्माण झाल्यामुळे तरुण मौजमजा करण्यासाठी घरातील पैसे चोरत आहेत. 
 ई. आजचे तरुण पैशाच्या जोरावर केलेली अनैतिक कृत्ये पाहतात, त्यामुळे त्यांची सामाजिक नीतीमत्ता ढासळत आहे. त्यांचे भवितव्य अंधकारमय होत आहे. 
 
  ४. पालकांच्या अयोग्य भूमिका ! 
अ. जागतिकीकरणाचा संस्कृतीवर परिणाम होणे, हे स्वाभाविकच असले, तरी त्यांना मार्गदर्शन करणारे कुणीही नाही. अगदी पालकही ती भूमिका निभावत नाहीत. 
 आ. पूर्वी दिवे लागण्यापूर्वी घरी परत येण्याचा पायंडा होता. परंतु आज रात्री-अपरात्री घरी येणार्‍याया मुलांचे पालकांना कौतुक वाटते. हाच पालकांचा दृष्टीकोन मुलांचे भवितव्य उद्ध्वस्त करत आहे. 
  
  ५. पालकांनो, भरकटलेल्या तरुण पिढीला दिशा देण्यासाठी हे करा ! 
अ. मुलांचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी पालकांनी मुलांबरोबर संवाद साधणे आवश्यक आहे. 
 आ. पालकांनीच संस्कारांचे ओझे मुलांवर ठेवले, तर मुले गुन्हेगारी करण्यापासून परावृत्त होतील आणि देशाच्या विकासाला हातभार लावतील..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट यशाची

💁‍♂ _*पालकांनो, काळ बदललाय, तुम्हीही बदला!*_

मुलांचे मित्र व्हा आणि त्यांना आपले विचार कळू द्या - भगवंत चव्हाण