विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमचे धेय्य


वेगवेगळ्या वयामध्ये मुलांची भावनिक प्रगल्भता, भावनांचं प्रकटीकरण बदलतं. भाषिक विकास, कल्पनाशक्ती, विचारशक्ती यांमध्ये वयानुसार बदल होतात. याबाबत मानसतज्ज्ञांनी केलेल्या पाहणीतील निरीक्षणे………
प्रत्येक मूल वाढवताना आईवडील अनेक प्रयोग करत असतात. स्वतःच्याच मुलांमधला फरक आईवडिलांना जाणवत असतो. म्हणजेच प्रत्येक मूल हे जन्मतः स्वतंत्रबुद्धी, क्षमता, प्रज्ञा घेऊन जन्माला आलेलं असतं. त्यामुळे प्रत्येकाचंव्यक्तिमत्त्व स्वतंत्र असतं.मूल वाढवायच्या काहीपारंपरिक पद्धतींबरोबर आजकाल नवीन काही प्रयोग करून मुलांमधील क्षमतालक्षात घेऊन त्या वाढविण्याचा प्रयत्न पालक; तसेच शिक्षकही करत आहेत, हीखूप आनंदाची आणि आशादायक परिस्थिती आहे; पण मुलांच्या क्षमता कशा ओळखायच्याआणि त्या वाढवण्यासाठी काय प्रयत्न करायचे, याबाबत त्यांच्या मनात संभ्रमअसतो. मुलांच्या शारीरिक वाढीकडे लक्ष देण्याबरोबरच मुलांच्या भावनिक आणिबौद्धिक विकासाचाही विचार केल्यास हा संभ्रम दूर होऊ शकतो. जशी शारीरिक वाढटप्प्या- टप्प्याने होते, तशीच भावनिक व बौद्धिक वाढही टप्प्यानेच होते, त्यामुळे हे टप्पे विचारात घेऊन प्रयत्न केल्यास मुलांना वाढविण्याचे कामसोपे होईल.वेगवेगळ्या वयामध्ये मुलांची भावनिकप्रगल्भता, भावनांचे प्रकटीकरण बदलतं. भाषिक विकास, कल्पनाशक्ती, विचारशक्ती यांमध्ये वयानुसार बदल होतात. हे टप्पे लक्षात घेऊन मुलांशीवागण्याची पद्धत अवलंबल्यास मुलांशी सुसंवाद वाढायला मदत होते. मुलांनामिळणाऱ्या पोषक वातावरणाबरोबरच, मानसतज्ज्ञांनी ६ ते १२ वर्षांच्यामुलांबरोबर सातत्याने विविध प्रकारची माध्यमं वापरून काम केल्यास त्याचानिश्‍चितपणे सकारात्मक परिणाम दीर्घ काळापर्यंत जाणवतो.ंमुलांच्याजास्त जवळ नेऊ शकणारी माध्यमं म्हणजे खेळ, गोष्टी, गाणी शिवाय मुलांच्याक्षमता विकसनासाठी विशिष्ट उद्दिष्ट ठेवून घेतलेले बौद्धिक खेळ, प्रकल्पगटचर्चा यांचा प्रभावी उपयोग मानसतज्ज्ञ मुलांबरोबर काम करताना करतात.

झेप फाऊंडेशनने विद्यार्थांच्या संदर्भात हेच काम करतात. यातूनच शाळेच्या नेहमीच्या तासांपेक्षा खूपच वेगळ्या स्वरूपाचे तास इयत्ता १ली ते ४ थी या वर्गांसाठी वर्षभर घेतले गेले.
शाळेच्या पालक-शिक्षक संघातर्फे मुलांच्या नैतिक सामाजिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी काम करण्याचा विचार मांडला आणि हेच उद्दिष्ट समोर ठेवून प्रकल्पाची आखणी केली.
सुरवातीचा काही काळ मुलांशी सुसंवाद वाढविण्यासाठी गाणी, गोष्टी, गंमतखेळ घेतले. कृतियुक्त गाण्यांमधून, गोष्ट पूर्ण करा वगैरेमधून मुलांनामोकळे आणि बोलते करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हळूहळू बौद्धिक खेळांकडेमुलांना वळवायचे होते. त्याची तयारी म्हणून मुलांची स्थिरता, एकाग्रता, अवधानकक्षा वाढवण्यासाठी ओंकार, श्‍वसनाचे व्यायाम, प्रार्थना याचा उपयोगकेला.
काही काळाने मुलांचे बौद्धिक खेळ घ्यायला सुरवात केली. ते बुद्धिमत्तेशीनिगडित पैलूंवर आधारित असतात. बुद्धिमत्ता ही एकजिनसी नसते. पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त रोजच्या आयुष्यातही बुद्धिमत्तेचे वेगवेगळे पैलू वापरलेजातात. गिलफोर्ड या मानसशास्त्रज्ञाने बुद्धिमत्तेचे १५० पैलू शोधून काढलेआहेत. कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, बहुदिश विचार आदी पैलू हे त्यांपैकीच आहेत.या पैलूंचा विकास करण्याच्या हेतूने बौद्धिक खेळ आखले जातात.
नैतिक विकासाचा हेतू ठेवून केलेल्या कामाबरोबरच इतरही काही गरजा जाणवल्या. त्यांपैकी एक म्हणजे स्वच्छतेचा प्रश्‍न. तो सोडविण्यासाठीवैयक्तिक स्वच्छतेचा प्रकल्प मुलांना करायला दिला. यात स्वतःचे कपडे स्वच्छ ठेवणे, वैयक्तिक स्वच्छता इ. विषय होते. यासाठी आणि वर्तन सुधारण्यासाठीबक्षीस-शिक्षा तंत्रवापरले.
खेळ, गोष्टी, गाणी, बौद्धिक खेळ, प्रकल्प आदींच्या वापरातून वर्षांच्याशेवटी मुलांमध्ये जाणवण्यासारखे बदल दिसून आले. उदा. मुलांमधील मारामारी, भांडणे कमी करण्यासाठी गोष्टींमध्ये मारामारी करणारा ससा मोनूकसा वाईटअसतो आणि त्यामुळे त्याच्याशी कोणी कसं बोलत नाही; मग तुम्हाला कोणी मोनूम्हटलं तर चालेल का? असा प्रतिप्रश्‍न करून गोष्टीद्वारे वाईट वर्तणुकीचेपरिणाम त्यांच्यावर बिंबवले, आणि काही काळातच मारामारी, भांडणं कमी झाली.बौद्धिक खेळाच्या सवयीमुळे आपणहून विचार करणं सुरू झालं. प्रश्‍न विचारणंवाढलं. प्रकल्पसदृश बौद्धिक खेळातून मुलांमधील नेतृत्वगुण सहकार्यवृत्तीसकल्पनाशक्ती समस्या निवारणक्षमता आदींचे निरीक्षण करता आले.
या वार्षिक शिबिरातील अनुभवांची पालकांबरोबर देवाण-घेवाण करण्यासाठी आणिमुलांच्या विकासाकडे पालकांनी डोळसपणे बघावे, क्षमताविकासाचा प्रयत्नकरावा यासाठी वर्षाच्या शेवटी सुजाण पालकत्व कार्यशाळा आयोजित केली. याकार्यशाळेला पालकांचा प्रतिसाद उत्तम होता.

लहान मुलांसाठी आज बाजारात खूप काही मिळतं. खास मुलांसाठीची दुकानं आहेतआणि शॉपिंग मॉल्सही सुरू होत आहेत. कपड्यांपासून खेळण्यांपर्यंत आणिपुस्तकांपासून विविध शैक्षणिक साधनांपर्यंत अनेक वस्तू मुलांसाठी सहजगत्याउपलब्ध आहेत. मुलांसाठीचे कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या दूरचित्रवाणीवाहिन्या आहेत. इंटरनेटवरही मुलांसाठीच्या वेबसाइट्‌स आहेत. आणि आता तरमुलांना आकर्षिक करणारे मोबाईल फोनही येत आहेत. या सर्व माध्यमांचा आणिकाही खेळण्यांचा शिक्षणासाठी उपयोग होतोच; पण ते क्षणिक ठरण्याची शक्यताअसु शकते.
वृत्तपत्रांमध्ये ताज्या बातम्या असतात. प्रासंगिक लेख असतात आणि लहानमुलांसाठीची सदरेही असतात. त्यामुळे मुलांना वृत्तपत्रं वाचण्याची सवयलावली पाहिजे. मूल सहा महिन्यांचे झाल्यापासून त्याला वृत्तपत्र दाखविण्याससुरवात करावी. त्यामधील रंगीत छायाचित्रांकडे मुलं लगेचच आकर्षित होतात.मुलांना कळू लागलं, की त्यांना वृत्तपत्र द्यायला लागा. त्यातील रंजकबातम्या, लहान मुलांसाठीचा मजकूर वाचवून दाखवा. छोट्यांसाठी असलेली कोडीकशी सोडवायची हे सांगा. बहुतेक वृत्तपत्रांत चित्र रंगविण्यासाठीचे सदरअसते. मुलांना चित्र रंगविण्यास सांगा. रंगवलेल्या चित्रांची चिकटवही तयारकरा. मुलांसाठीच्या गोष्टींची कात्रणंही काढून ठेवा. त्यांची चिकटवही करा.ही कामं करण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्या. मुलं रमू लागतील आणिवृत्तपत्रांची आणि त्यांची गट्टी होईल. एकदा का सवय लागली, की मुलं मगवृत्तपत्राची, त्यातील बालकांसाठीच्या पुरवणीची वाट पाहू लागतील. आणि एकदावृत्तपत्र वा पुरवणी हाती आली, की ते लगेचच चित्र रंगविण्यास किंवा कोडीसोडविण्यास सज्ज होतील.वृत्तपत्रांतीलऍक्‍टिव्हिटीकरण्याबरोबरच ते वाचण्याची सवयही लावायला हवी. पालकांनी मुलांसमवेत किमान पाचेक मिनिटं तरी वृत्तपत्र वाचायला हवं. मुलांनामोठ्यानं वृत्तपत्र वाचायला सांगावं. वृत्तपत्रांत प्रसिद्ध होणाऱ्याछायाचित्रांतील व्यक्तींची ओळख करून द्या. हळूहळू मुलं स्वतःच छायाचित्रांतील व्यक्ती ओळखू लागतील. पावसाच्या बातम्या असल्या तर मगमुलांना जलचक्र समजावून द्या. वृत्तपत्र वाचून झाल्यानंतर त्यातीलमहत्त्वाच्या माहितीची कात्रणं काढण्यासही मुलांना प्रवृत्त करा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुमच्या मुलाच्या अभ्यासची गती वाढण्यासाठी एक सोपी युक्ती

मानवी वर्तनाचा ठाव घेणारे मानसशास्त्र !! भगवंत चव्हाण

पालकांनो, मुलांना थोडा वेळ द्या, त्यांना समजून घ्या!