पोस्ट्स

जानेवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मुलांचे मित्र व्हा आणि त्यांना आपले विचार कळू द्या - भगवंत चव्हाण

 आपल्या मुलांच्या सहवासात तुम्ही वेळ घालवता तेव्हा त्यांच्याशी तुमचा एक विशेष बंध तयार होतो. शिवाय, यामुळे मुले आपले विचार व भावना चांगल्याप्रकारे व्यक्‍त करण्यास शिकतात. मुलांसोबत अशी जवळीक—घरातच नव्हे तर बाहेरही आणि कोणत्याही उचित वेळी असणे महत्त्वाचे आहे असे शास्त्रवचनांतही सांगण्यात आले आहे.—  महागड्या खेळण्यांपेक्षा किंवा विशिष्ट प्रकारच्या प्रशिक्षणापेक्षा आईवडील आपल्या मुलांसोबत जो वेळ घालवतात तो जास्त महत्त्वाचा असतो, या गोष्टीला बाल विकास तज्ज्ञ देखील दुजोरा देतात. ज्यांकरता वेगळा खर्च करावा लागणार नाही अशी दररोजची कामे करतानाही तुम्ही मुलांसोबत संवाद साधण्याच्या संधी निर्माण करू शकता. उदाहरणार्थ, मुलांना बागेत फिरायला नेऊन निसर्गातल्या विविध गोष्टींचे त्यांच्यासोबत तुम्ही निरीक्षण करू शकता. असे करताना त्यांना अर्थपूर्ण प्रश्‍न विचारून त्यांना आपले विचार व्यक्‍त करण्याचे प्रोत्साहन तुम्हाला देता येईल. शास्त्रवचनांत म्हटले आहे, की “नृत्य करण्याचा,” अर्थात आनंदाने बागडण्याचाही एक समय असतो. मोकळेपणाने खेळणे हे मुलांच्या बौद्धिक, भावनात्मक आणि सामाजिक विकासाकरता आवश्‍यक आ...

पालकांनो, मुलांना थोडा वेळ द्या, त्यांना समजून घ्या!

हल्ली मुलांचे संगोपन करणे म्हणजे कौशल्याचे काम आहे. कारण स्पर्धात्मक युगात माझी मुलगी किंवा माझा मुलगा मागे पडू नये यासाठी पालकांना सतत चिंता सतावत असते. पण लक्षात घ्या मुलं हे मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात त्याला जसं घडवू तसं ते घडतं. मुलांना आपण जे सांगू किवा आपण जसं बोलतो त्याचा परिणाम मुलांवर होतो.  त्यामुळे पाल्याची बौद्धिक, मानसिक, शारीरिक, वाढ होत असताना वस्तुरूपी प्रेम नाही तर तुम्ही दिलेला वेळ बहुमूल्य असतो. त्यामुळे पालकांनी TV, Laptop, Computer, Tab, Mobile बाजूला ठेवून काही मुलांसोबत गप्पा मारायला हव्यात. हा उपक्रम खूप सकारात्मक बदल घडवून आणतो, आपल्यात आणि आपल्या पाल्यातही. आजची पिढी Gadget प्रिय. ती काळाची गरज सुद्धा आहे पण आपला पाल्य Gadget वर किती वेळ असतो. नेमक इंटरनेटवर काय Surfing करतोय? यावर लक्ष ठेवायला काहीच हरकत नाही. मात्र ते ही त्याला नकळत.  सध्या स्वतःला त्रास देणं (self harm), चिडचिड करणं, सतत रागावणं, ह्या गोष्टी सध्या मुलांमध्ये जास्त दिसून येतात. अशात मुलांशी बोलण्यात काहीच उपयोग नसतो. यावेळी आपलाही पारा चढण्याची शक्यता असते. अशा वेळी पाल्...

तुमच्या मुलाच्या अभ्यासची गती वाढण्यासाठी एक सोपी युक्ती

जेव्हा मुले संध्याकाळी खेळून घरी येतात, क्लासला जाऊन येतात, किंवा दमून घरी येतात, तेव्हा कधीही मुलांना आल्या-आल्या “आता अभ्यासाला बसा” असं अजिबात सांगू नका. विशेषत: खेळून आल्यावर तर नाहीच नाही. कारण ‘अशावेळी’ हे वाक्य ऐकलं की मुलांना संताप येतो. अभ्यासाविषयी मनात अनास्था निर्माण होते. आणि मग अभ्यास न करण्याच्या नवनवीन सबबी मुले सुरू करतात. या सबबी ऐकल्या की तुमचं डोकं फिरू लागतं. अशावेळी तुमच्या मुलाला समजून घेण्याऐवजी, तुमच्या अंतर्मनात दडून असलेला राग एकदम उसळून वर येतो, तुम्ही बोलू लागता, “एव्हढावेळ खेळ झाला, टाइमपास झाला, तरी समाधान झालं नाही. अजूनही तुला अभ्यास करायचा नाही. तू काय ठरवलं आहेस तरी काय?” लक्षात घ्या, या तुमच्या प्रश्नाला उत्तर न देता मुलं गप्प बसतात. तुमच्याकडे एकटक पाहात तरी राहतात, किंवा तुमची नजर चुकवून, नेमकी तुम्हाला नावडणारी एखादी कृती करतात. या गोष्टीचा तुम्हाला निश्चितच अतिशय राग येतो. आणि मग तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला तुम्हीच उत्तर देता, जी तुम्हाला सोयीची असतात.  यामुळे, तुम्ही आणि तुमचा मुलगा यामधे विनाकारण नकळत क्रोधामुळे, एक दरी निर्माण ह...