पोस्ट्स

2019 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*पती-पत्नीसाठी* *HAPPY MARRIED LIFE*

इमेज
www.zepfoundation.in शिर्डी येथील साई हेरिटेज व्हीलेजच्या निसर्गरम्य वातावरणात 3 दिवशीय निवासी प्रशिक्षण आजकालच्या धावपडीचा परिणाम प्रत्येकाच्या आयुष्यावर होतांना दिसून येत आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात असलेल्या सुंदर अश्या नात्यांमद्धे दुरावा निर्माण होतांना दिसत आहे. आम्ही फक्त नावालाच पती पत्नी असतो. खर जगन काय असत हे आम्ही विसरून जातो परंतु काही वैज्ञानिक पद्धतींचा वापर करून आपण आपल्या वैवाहिक जीवनात अजून गोडवा आणू शकतो. आणि तोच सुंदर अनुभव घेण्यासाठी आपल्यासाठी घेवून आलो आहोत एक प्रभावशाली ट्रेनिंग                   HAPPY MARRIED LIFE  कार्यक्रम कोणासाठी ? 1) लग्न ठरलय !! चला तर मग यावच लागेल.... 2)नुकतच लग्न झालय !! चला सुरुवात सुंदर करूया..... 3)काय संसारात गुंतलाय !! आपल्यासोबत आपल्या मुलांना घडवण्यासाठी... 4)आता म्हातारे झालात !! शेवटचे क्षण सुंदर जगण्यासाठी..... कार्यक्रमाला का यायचं ? 1) एकमेकांना वाटत असेन माझ्या जोडीदाराची ही सवय वाईट आहे ती कायमची त्यांच्या आयुष्यातून घालवण्यासाठी.... 2) पतीला किंवा पत्नीला वाटत असेन माझी एकही इच्छा माझा जोडीदार

पालकांनो, मुलांना थोडा वेळ द्या, त्यांना समजून घ्या!

हल्ली मुलांचे संगोपन करणे म्हणजे कौशल्याचे काम आहे. कारण स्पर्धात्मक युगात माझी मुलगी किंवा माझा मुलगा मागे पडू नये यासाठी पालकांना सतत चिंता सतावत असते. पण लक्षात घ्या मुलं हे मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात त्याला जसं घडवू तसं ते घडतं. मुलांना आपण जे सांगू किवा आपण जसं बोलतो त्याचा परिणाम मुलांवर होतो.  त्यामुळे पाल्याची बौद्धिक, मानसिक, शारीरिक, वाढ होत असताना वस्तुरूपी प्रेम नाही तर तुम्ही दिलेला वेळ बहुमूल्य असतो. त्यामुळे पालकांनी TV, Laptop, Computer, Tab, Mobile बाजूला ठेवून काही मुलांसोबत गप्पा मारायला हव्यात. हा उपक्रम खूप सकारात्मक बदल घडवून आणतो, आपल्यात आणि आपल्या पाल्यातही. आजची पिढी Gadget प्रिय. ती काळाची गरज सुद्धा आहे पण आपला पाल्य Gadget वर किती वेळ असतो. नेमक इंटरनेटवर काय Surfing करतोय? यावर लक्ष ठेवायला काहीच हरकत नाही. मात्र ते ही त्याला नकळत.  सध्या स्वतःला त्रास देणं (self harm), चिडचिड करणं, सतत रागावणं, ह्या गोष्टी सध्या मुलांमध्ये जास्त दिसून येतात. अशात मुलांशी बोलण्यात काहीच उपयोग नसतो. यावेळी आपलाही पारा चढण्याची शक्यता असते. अशा वेळी पाल्याचे म्हण

तुमच्या मुलाच्या अभ्यासची गती वाढण्यासाठी एक सोपी युक्ती

जेव्हा मुले संध्याकाळी खेळून घरी येतात, क्लासला जाऊन येतात, किंवा दमून घरी येतात, तेव्हा कधीही मुलांना आल्या-आल्या “आता अभ्यासाला बसा” असं अजिबात सांगू नका. विशेषत: खेळून आल्यावर तर नाहीच नाही. कारण ‘अशावेळी’ हे वाक्य ऐकलं की मुलांना संताप येतो. अभ्यासाविषयी मनात अनास्था निर्माण होते. आणि मग अभ्यास न करण्याच्या नवनवीन सबबी मुले सुरू करतात. या सबबी ऐकल्या की तुमचं डोकं फिरू लागतं. अशावेळी तुमच्या मुलाला समजून घेण्याऐवजी, तुमच्या अंतर्मनात दडून असलेला राग एकदम उसळून वर येतो, तुम्ही बोलू लागता, “एव्हढावेळ खेळ झाला, टाइमपास झाला, तरी समाधान झालं नाही. अजूनही तुला अभ्यास करायचा नाही. तू काय ठरवलं आहेस तरी काय?” लक्षात घ्या, या तुमच्या प्रश्नाला उत्तर न देता मुलं गप्प बसतात. तुमच्याकडे एकटक पाहात तरी राहतात, किंवा तुमची नजर चुकवून, नेमकी तुम्हाला नावडणारी एखादी कृती करतात. या गोष्टीचा तुम्हाला निश्चितच अतिशय राग येतो. आणि मग तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला तुम्हीच उत्तर देता, जी तुम्हाला सोयीची असतात.  यामुळे, तुम्ही आणि तुमचा मुलगा यामधे विनाकारण नकळत क्रोधामुळे, एक दरी निर्माण होते.